अमळनेरमध्ये माता रमाई जयंती उत्साहात साजरी – आंबेडकरी युवांकडून अभिवादन..

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर, 7 फेब्रुवारी – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात मोलाची साथ देणाऱ्या माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फरशी रोड येथील तथागत गौतम बुद्ध सांस्कृतिक केंद्रात AB GROUP, अमळनेर शहराच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी आंबेडकरी समस्त युवा पिढीने माता रमाई यांच्या कार्याला व त्यागाला अभिवादन केले. माता रमाई यांच्या अथक परिश्रमांमुळे दलित समाजाला हक्क, अधिकार आणि प्रगतीची दिशा मिळाली. त्यांच्या विचारांना नवचैतन्य देण्याचा संकल्प या वेळी उपस्थित समाजबांधवांनी केला.
कार्यक्रमात प्रा. जितेंद्र संदनशिव, विशाल सोनवणे, राज रामराजे, गौरव सोनवणे, अजय बी. बिऱ्हाडे, धीरज ब्रह्मे, अजय बिऱ्हाडे, राहुल बिऱ्हाडे, दर्शन बिऱ्हाडे, अक्षय सोनवणे, सोनू बिऱ्हाडे, मोसीम बागवान, रुद्र सांदनशिव, इम्रान पठाण, विकी भोई, नमन नगराळे आदी उपस्थित होते.
या अभिवादन सोहळ्याच्या माध्यमातून माता रमाईंच्या कार्याची महती समाजात रुजवण्याचा संदेश देण्यात आला.