राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला उत्साहात सुरुवात

आबिद शेख/अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि मा.जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांच्या समवेत सदस्य नोंदणी फॉर्म भरून या अभियानाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी अमळनेर मतदारसंघातील प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदस्य नोंदणीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
अभियानाच्या शुभारंभानंतर पक्षात नव्या सदस्यांची मोठ्या प्रमाणात भर घालण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला.