अमळनेर पत्रकार संघाचा सेमीफायनल मध्ये प्रवेश – -आज चाळीसगावशी थरारक सामना…

आबिद शेख/अमळनेर
जळगाव येथे सुरू असलेल्या पत्रकार प्रीमियर लीगमध्ये अमळनेर पत्रकार संघाने दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. उत्कृष्ट संघभावना आणि खेळाडूंच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर अमळनेरने एरंडोल संघावर सहज विजय मिळवला.
आर. जे. पाटील यांनी तुफानी फलंदाजी करत 64 धावा फटकावल्या, ज्यामुळे संघाला मजबूत स्थिती मिळाली. त्यांच्या या कामगिरीमुळे अमळनेरमधील पत्रकार व क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आज सेमीफायनलमध्ये अमळनेरचा मुकाबला चाळीसगावशी होणार आहे. अमळनेर संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून चाहत्यांचे लक्ष त्यांच्या पुढील खेळीवर केंद्रित आहे.