अमळनेर मध्ये गांजा विक्रीचा प्रयत्न उधळला; आरोपी रंगेहाथ ताब्यात

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथे गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या शिरपूर येथील एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्याच्याकडून २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि अमळनेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. पिवळ्या रंगाच्या रिक्षा (क्रमांक MH 18 AJ 3792) मधून गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पारोळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, नायब तहसीलदार प्रशांत धमके, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, तसेच पोलीस कर्मचारी रवींद्र पाटील, दीपक माळी, जितेंद्र निकुंभे, सुनील महाजन, अमोल पाटील आणि विनोद संदानशीव यांनी संयुक्तपणे चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमाजवळ सापळा रचला.
रात्री ९:२५ वाजता संशयित रिक्षा अमळनेरमध्ये प्रवेश करताच पोलिसांनी वेळीच कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.