संजय पवार क्रिकेट अकॅडमीचा इंटर क्लब क्रिकेट लीगमधील संघर्षपूर्ण प्रवास..

आबिद शेख/अमळनेर
इंटर क्लब क्रिकेट लीगमध्ये संजय पवार क्रिकेट अकॅडमीच्या Under-12 आणि Under-14 संघांनी उत्कृष्ठ कामगिरी करत सामना चुरशीचा बनवला.
Under-12 गटात तीन सामन्यांपैकी एक विजय मिळवत दोन पराभव स्विकारावे लागले. Under-14 गटातही संघाने समान कामगिरी करत एक सामना जिंकला व दोन गमावले. पुढील पात्रता फेरीसाठी दोन सामने जिंकणे गरजेचे होते, मात्र अंतिम क्षणी संघ पात्रता फेरीत पोहोचू शकला नाही.
तरीही खेळाडूंनी जबरदस्त जिद्द दाखवत स्पर्धेत दमदार कामगिरी केली. विशेषतः Under-12 गटातील खेळाडूंचा खेळ कौतुकास्पद ठरला. या गटात बडोद्याच्या संग्रामसिंह गायकवाड क्रिकेट अकॅडमी आणि नेशनल क्रिकेट अकॅडमीसारख्या तगड्या संघांनी सहभाग घेतला.
संपूर्ण स्पर्धेत संजय पवार क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य आणि जिद्द दाखवली, जी त्यांना भविष्यात यश मिळवण्यास मदत करेल.