नोबेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शानदार आयोजन…

आबिद शेख/अमळनेर
धरनगाव, 16 फेब्रुवारी 2025 – इक़रा वेलफेयर सोसायटी संचालित नोबेल इंग्लिश मीडियम स्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इक़रा एज्युकेशन सोसायटी, जळगावचे चेअरमन इलहाज डॉ. अब्दुल करीम सालार साहेब होते. तसेच, विशेष अतिथी म्हणून फारूक कादरी साहेब (अध्यक्ष, कादरी फाउंडेशन, जळगाव) उपस्थित होते.
या सोहळ्याला धरनगाव शहर मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी इरफान हाजी अरमान, मुस्लिम कब्रस्तान कमिटी अध्यक्ष हाजी हफीज़ोद्दीन मिनानगरी, मोमिन वेलफेयर सोसायटी अध्यक्ष हाजी खालीक मोमिन, खिदमत फाउंडेशन अध्यक्ष मोहम्मद नईम काझी, उपाध्यक्ष महेबुब पठान, हाजी सादिक बागवान, निसार अली सैय्यद, अॅड. आसिफ अली कादरी, इक्बाल सर, फारूक शेख इब्राहिम साहेब यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इक़रा वेलफेयर सोसायटी अध्यक्ष रियाज़ अली काझी, सेक्रेटरी करीम खान, सदस्य रहमान शाह, नदीम काझी, नईम मोमिन, अब्दुल बारी सर, हाफिज नदीम, शेख आसिफ यांनी विशेष मेहनत घेतली.
विद्यार्थ्यांच्या विविध सादरीकरणांनी उपस्थित मान्यवर आणि पालकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण शाळेचे कौतुक होत आहे.