अमळनेर मध्ये उद्या ‘सुनहरी यादें’ संगीत कार्यक्रम; लता मंगेशकर यांना स्वरांजली..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर भारतरत्न, दिवंगत लता मंगेशकर यांच्या सुमधुर गीतांचा ‘सुनहरी यादें’ हा विशेष संगीतमय कार्यक्रम उद्या (दि. १८) संध्याकाळी ७ वाजता जुन्या टाउन हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम लाईव्ह म्युझिकसह सादर केला जाणार असून, रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे.
स्वरांजली म्युझिकल ग्रुपचे संचालक किशोर देशपांडे आणि मिलिंद पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संगीतप्रेमींनी या संगीतमय पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.