बोहरा रस्त्यावर महसूल विभागाची कारवाई : बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त..

आबिद शेख/अमळनेर. -बोहरा येथील रस्त्यावर महसूल विभागाने बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करत ते जप्त केले. १६ तारखेला ही कारवाई करण्यात आली. ट्रॅक्टर आणि त्यातील मूसम्मल तस्करीचे साहित्य तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी नितिनकुमार मुंडे आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात ग्राम महसूल अधिकारी अभिमान जाधव (कऱ्हे), विक्रम कदम (शाहूवाडी), पवन शिंगारे (सावर्डे), दिपक पाटील (डिग्र बु.), अमित कोकणे (जखडे) आणि आकांशा गिरी (पाटोद) यांनी सहभाग घेतला.
महसूल विभागाच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.