प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट 1991 प्रभावीपणे लागू करण्याची मागणी – इकरा हसन यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल..

24 प्राईम न्यूज 17 Feb 2025.
कैरानाच्या समाजवादी पक्षाच्या खासदार इकरा हसन यांनी प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट 1991 प्रभावीपणे लागू करण्याची मागणी करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.
याचिकेत हसन यांनी चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, मशिदी आणि दरगाहांना लक्ष्य करून सातत्याने खटले दाखल केले जात आहेत. तसेच, कोणतीही ठोस चौकशी अथवा कायदेशीर आधार नसताना सर्वेक्षणाचे आदेश दिले जातात, जे धार्मिक तणाव वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात. अशा घटनांमुळे संविधानिक मूल्ये, सामाजिक सलोखा आणि सहिष्णुतेला धोका निर्माण होतो, असा दावा त्यांनी केला आहे.