पाडळसरे धरणाच्या निधीवर गदा येणार? जन आंदोलन समितीचा इशारा!

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा कोट्यवधींचा निधी खेडी भोकरी पुलासाठी दिल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पाडळसरे धरण जन आंदोलन समितीने दिला आहे. समितीने राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कार्यकारी अभियंता निम्न तापी प्रकल्प पाडळसरे आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पाडळसरे धरणाचे काम गेल्या २५ वर्षांपासून निधीअभावी संथ गतीने सुरू आहे. दरवर्षी फक्त १०० कोटींचा निधी मिळतो, त्यामुळे काम अपूर्ण राहते आणि प्रकल्पाची किंमत वाढत जाते. दुसरीकडे, खेडी भोकरी पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ७५ कोटी, तर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या निधीतून ७५ कोटी असा एकूण १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वीच धरणाच्या निधीतून १५ कोटी रुपये पुलासाठी दिले गेले आहेत.
समितीने सरकारला स्पष्ट शब्दांत सांगितले की, उर्वरित निधी देखील पुलासाठी वळविल्यास धरणाचे काम ठप्प होईल आणि प्रकल्पाच्या उद्देशावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे खेडी भोकरी पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतंत्र निधी उपलब्ध करावा, अशी मागणी समितीने केली आहे.
यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ, कार्यकारी संचालक तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, महेश पाटील, हेमंत भांडारकर, सुनिल पाटील,