अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भव्य सन्मान सोहळा आणि विकासकामांचे लोकार्पण १९ फेब्रुवारीला…

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर – अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा, भव्य शेतकरी सभासद सन्मान सोहळा तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. जयकुमारजी जितेंद्रसिंह रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती दिनी, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात मा.ना. जयकुमारजी जितेंद्रसिंह रावल यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील असतील. तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिता उदय वाघ यांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडेल. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व माजी जि.प. सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शेतकरी सभासद बांधवांचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच शिवजयंतीनिमित्त सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांचे ‘कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या भव्य सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पिरन पाटील व संचालक मंडळ तसेच सचिव यांनी केले आहे.