लाडक्या बहिणींसाठी नवे नियम लागू, आता दरवर्षी करावे लागणार KYC!

आबिद शेख/अमळनेर
लाडक्या बहिणींच्या योजनेत मोठा बदल करण्यात आला असून, लाभार्थी महिलांसाठी दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकार आता लाभार्थींची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेणार आहे.
सरकारच्या तिजोरीवरील वाढता भार आणि गैरवापर रोखण्यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, काहीजण याला लाभार्थींची संख्या कमी करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप करत आहेत.
या योजनेत यापूर्वीच 5 लाख महिलांची पात्रता काढण्यात आली असून, सध्या 2 कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ मिळत आहे. तसेच, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीने लाभार्थींची पात्रता तपासणी सुरू आहे.
दरम्यान, आठव्या हफ्त्याचे पैसे पुढील 8 दिवसांत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.