‘छावा’ चित्रपट करमुक्त करण्याची भाजपाची मागणी..

0

आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य व पराक्रमावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी अमळनेर भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

या चित्रपटाद्वारे परकीय आक्रमणांच्या कालखंडाचे प्रभावी चित्रण करत छत्रपती संभाजी महाराजांची ऐतिहासिक कारकीर्द नव्या पिढीसमोर आणण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला गेला आहे. ग्रामीण भागातील सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे कमी झाल्याने, मल्टिप्लेक्समधील महागड्या तिकिटदरामुळे सर्वसामान्यांना चित्रपट पाहणे कठीण जाते. मागील सरकारच्या काळात ऐतिहासिक संदर्भ असलेल्या चित्रपटांना करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्याच धर्तीवर ‘छावा’ चित्रपटालाही करमुक्त करावे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना तो पाहता येईल आणि राष्ट्रभावना वृद्धिंगत होईल, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसाठी भाजपाचे शहर अध्यक्ष विजयसिंग राजपूत, माजी शहर अध्यक्ष उमेश वाल्हे, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, युवा मोर्चा शहर अध्यक्ष देवा लांडगे, विजय बारी, समाधान पाटील, शिवकिरण बोरसे आदींनी सह्या केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!