इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा…

24 प्राईम न्यूज 19 Feb 2025

नंदुरबार – इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आज (19 फेब्रुवारी 2025) छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विभागीय पोलीस उप अधीक्षक संजय महाजन यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मराठा समाजाचे अध्यक्ष मा. प्राचार्य बी. एस. दादा पाटील, इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मानेळ, माजी नगरसेवक मोहन भाऊ श्रॉफ, माजी मुख्याध्यापक एच. डी. मराठे, सदा जनसेवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष हाजी असलम चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नासिर इब्राहिम बागवान, प्राध्यापक राहुल मोरे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
यानंतर मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक बाजीराव बळीराम पाटील, अधीक्षक सुरेश सिंग गिरासे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी सांगितले की, “रयतेचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संस्थेतर्फे दरवर्षी साजरी केली जाते. शिवरायांचे विचार प्रेरणादायी असून, त्यांच्या आदर्शांवर समाजाने वाटचाल करावी.”