इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी..

0

24 प्राईम न्यूज 19 Feb 2025

नंदुरबार – इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन नंदुरबारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज, 19 फेब्रुवारी 2025 रोजी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात नंदुरबार विभागीय पोलीस उप अधीक्षक श्रीमान संजय महाजन यांच्या हस्ते महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मराठा समाजाचे अध्यक्ष मा. प्राचार्य बी. एस. दादा पाटील, इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मानेळ, माजी नगरसेवक मोहन भाऊ श्रॉफ, माजी मुख्याध्यापक एच. डी. मराठे, सदा जनसेवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष हाजी असलम चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नासिर इब्राहिम बागवान, प्राध्यापक राहुल मोरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक श्री बाजीराव बळीराम पाटील, अधीक्षक श्री सुरेश सिंग गिरासे आणि शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “रयतेचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आम्ही दरवर्षी उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करत असतो. भविष्यातही असे उपक्रम सुरूच राहतील.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनच्या उत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. मजहरोदीन शेख, सचिव प्रताप सोनवणे, उपाध्यक्ष अजीम बागवान, उपाध्यक्ष शंकर जाधव, संघटक काशिनाथ वळवी आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!