आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार संघात उत्साहात साजरी होणार…

आबिद शेख/अमळनेर
मराठी पत्रकार परिषद, मुंबई यांच्या आवाहनानुसार जळगाव जिल्हा पत्रकार संघात २० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्वर्गीय आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव-भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. विजय बापू पाटील असतील, तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी श्री. युवराज पाटील आणि श्री. संदीप घोरपडे (अमळनेर) मार्गदर्शन करणार आहेत.
या सोहळ्याला खा. श्रीमती स्मिता ताई वाघ आणि आ. श्री राजु मामा भोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख आणि पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नरेंद्र नेहेते, अशोक भाटिया, लेखराज उपाध्याय, प्रमोद पाटील, भिका चौधरी, विवेक खडसे, दिलीप शिरूडे, मुकुंद एडके, पांडुरंग महाले, सारंग भाटिया आदींनी केले आहे.
विशेष म्हणजे २० फेब्रुवारी हा विजय बापू पाटील यांचा वाढदिवस असल्याने हा आनंदाचा दुहेरी सोहळा असेल. सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी.
- प्रमोद अण्णा पाटील
अध्यक्ष, जळगाव जिल्हा पत्रकार संघ