आज पासून जळगाव फुटबॉल चषक खुल्या गटातील स्पर्धा. जळगाव सह नाशिक, धुळे, बुलढाणा, अमरावती, नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश..

आबिद शेख/ अमळनेर
जळगाव स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आमंत्रितांच्या खुल्या गटातील “जळगाव फुटबॉल चषक” स्पर्धेला २० फेब्रुवारी गुरुवार पासून शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे सुरुवात होत असून या स्पर्धेत एकूण १२ आमंत्रित संघांचा समावेश आहे.
स्पर्धेतील रोख पारितोषिके व चषक
जळगाव स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत दरवर्षी जळगाव फुटबॉल चषक स्पर्धा चे आयोजन करण्यात येईल. २०२५ ला सुरुवात झाल्याने प्रथम पारितोषिक हे रोख २५ हजाराचे तर उपविजेता संघास रोख ११ हजार रुपयांचे पारितोषिक सह फुटबॉल चषक देण्यात येईल.
तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू गोलकीपर, डिफेंडर, स्कोरर यांना सुद्धा पारितोषिके देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी यांचे मिळाले सहकार्य
मलिक फाउंडेशनचे नदीम मलिक, डॉक्टर मनीष चौधरी, डॉक्टर मंदार पंडित, तांबापुर चे सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख उर्फ सोनूकडक ,राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू पोलिस उप निरीक्षक भास्कर पाटील, मनोज सुरवाडे व अल्ताफ शेख सह महावीर क्लासेस चे नंदलाल गादिया, रूप रंग पॅलेसचे फारुक मेमन, मकरा एजन्सी चे युसुफ मकरा, पेंट पॉईंट व नागोरी चहाआदींचे सहकार्य मिळत आहे.
स्पर्धेचा तपशील
२० फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यातील संघाचे चार सामने.
२१ फेब्रुवारी रोजी नाशिक ,धुळे, नंदुरबार, नाशिक, अमरावती यांचे चार सामने.
२२ फेब्रुवारी रोजी उपांत्य व अंतिम फेरीचे तीन सामने खेळवले जाणार आहेत.
क्रीडा प्रेमी, फुटबॉल खेळाडू पुरुष, महिला व विद्यार्थी यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.