हॉकी मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी जळगावमध्ये २२ फेब्रुवारीला..

आबिद शेख/ अमळनेर
जळगाव : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी, पुणे येथे १ ते ७ मार्च २०२५ दरम्यान होणाऱ्या सब-ज्युनियर व ज्युनियर मुलींच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट हॉकी खेळाडूंसाठी निवड चाचणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे २२ फेब्रुवारी, शनिवार रोजी सकाळी ८ वाजता घेतली जाणार आहे.
सब-ज्युनियर गटासाठी ०१/०१/२००९ व ज्युनियर गटासाठी ०१/०१/२००६ नंतर जन्मलेल्या मुलींनीच या चाचणीत सहभागी व्हावे. इच्छुक खेळाडूंनी सकाळी ७:३० वाजता उपस्थित राहून जन्मदाखला, आधार कार्ड व शाळेचा दाखला यांची प्रत सोबत आणावी, असे आवाहन हॉकी महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे व हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
- वर्षा सोनवणे : 88064 24365
- हिमाली बोरोले : 79856 62401