जळगाव फुटबॉल चषक स्पर्धाआज रंगणार अमरावती,बुलढाणा, धुळे मधील स्पर्धा..

आबिद शेख अमळनेर. जळगाव स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित जळगाव फुटबॉल चषक स्पर्धेला गुरुवारी शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरुवात झाली असून गुरुवारी या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस दलाचे राष्ट्रीय खेळाडू मनोज सुरवाडे तसेच तांबापुर येथील सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे, एकता संघटनेचे फारुक शेख व स्पोर्ट्स हाऊस चेअमीर शेख, शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका हिमाली बोरोले यांची उपस्थिती होती.

गुरुवारी झालेल्या सामन्यांचा निकाल
स्पोर्ट्स हाऊस जळगाव विजयी विरुद्ध यंग ब्लड भुसावळ पेनल्टी ४-१
उस्मान एफसी भुसावळ विजय विरुद्ध विनीत एफसी जळगाव २ – १
जळगाव फुटबॉल अकॅडमी विजय विरुद्ध स्पोर्ट्स हाऊस २ _ ०
शुक्रवारी होणारे सामने
१)धुळे विरुद्ध अमरावती
२)बुलढाणा एफसी विरुद्ध ईगल भुसावळ
३)अमरावती टायटन विरुद्ध उस्मान एफसी भुसावळ
स्पर्धेसाठी पंच
अकोला चे मान्यताप्राप्त पंच सर्वश्री जुनेद खान वसीम बॅक शाहिद खान रिजवान खान व जाहीर खान हे स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी करीत आहेत.