अमलनेर येथे आयकर जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न..

आबिद शेख/ अमळनेर
अमलनेर, २० फेब्रुवारी २०२५ – आयकर विभाग, सर्कल-१, जळगाव यांच्या वतीने करदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम हॉटेल मिडटाउन, कलागुरू टॉवर, सुभाष चौक, अमलनेर येथे पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. दीपक कुमार, उपायुक्त आयकर (DCIT), सर्कल-१, जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आयकर कायद्याचे महत्त्व आणि रोख व्यवहारांवरील नियमनाचे फायदे स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी श्री. विशाल माकवाने, अतिरिक्त आयुक्त, आयकर (Addl. CIT) होते. त्यांनी कर भरण्याचे फायदे आणि आर्थिक प्रगतीतील त्याचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सीए अजय हिंदुजा यांनी कर प्रणाली आणि आर्थिक विकास यातील संबंध विषद केले. श्री. आशिष गोकलानी यांनी व्यवसाय कर कायद्यांवरील अडचणी आणि सुलभ अनुपालनावर भर दिला.
श्री. सरजुसेठ गोकलानी, श्री. विनोद भैय्या पाटील, श्री. ओमप्रकाश मुंदाडे, श्री. रामदास निकुंभ आणि श्री. रमेश जीवनानी यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए नीरजजी अग्रवाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. राकेश रंजन यांनी केले. श्री. हिरालाल पाटील आणि श्री. अतिफ बेग यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
या उपक्रमामुळे करदात्यांमध्ये कर प्रणालीबाबत सकारात्मकता आणि विश्वास वाढण्यास मदत झाली असून, पारदर्शक आणि प्रभावी कर प्रशासनास चालना मिळाली आहे.