संत सखाराम महाराज संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त विकास दादा ज्ञानेश्वर महाराज यांचे दुःखद निधन..

आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर येथील संत सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे प्रमुख ज्येष्ठ विश्वस्त आणि विद्यमान मठाधिपती ह.भ.प. श्री प्रसाद महाराज गुरु ज्ञानेश्वर महाराज यांचे ज्येष्ठ बंधु श्री. विकास दादा ज्ञानेश्वर महाराज देव यांचे वयाच्या 76व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांचे निधन दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुवारी रात्री नाशिक येथे झाले. त्यांच्या पार्थिवाचे आज पहाटे अमळनेर येथे अंत्यसंस्कार विधीसाठी स्थलांतर करण्यात आले.
अंत्यसंस्कार आज सायंकाळी 4 वाजता, राहत्या घरापासून वाडी चौक, अमळनेर येथे पार पडणार आहेत.
या दुःखद प्रसंगी देव घराण्यातील आप्तेष्टांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य पांडुरंग वसखाराम माऊली प्रदान करतील, अशी प्रार्थना. विकास दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो.