चिमनपुरी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

आबिद शेख/अमळनेर
“आज मातीला सूर्य लाभला, शिवसुंदर केशरी… आज आमुचा राजा बसला, तख्त मराठीवरी!”
चिमनपुरी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायत, पिंपळे खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनियुक्त सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील आणि तंटामुक्त समिती अध्यक्ष निंबा दला चौधरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष बापू चौधरी, अरुण संभाजी पाटील, सुदाम बळीराम पाटील, लोटन रूपचंद भिल, ग्रामसेवक किरण लंकेश, ग्रामपंचायत शिपाई सुनील मुरलीधर पाटील, रोजगार सेवक संतोष पाटील, तसेच पुरुषोत्तम चौधरी, जयवंत पाटील, साहेबराव पाटील, गोकुळ पाटील, गोविंदा चौधरी, राजेंद्र पाटील यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी “जय शिवराय! जय जिजाऊ!” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरणादायी विचार मांडले.
गावकऱ्यांच्या सहभागाने शिवजयंतीचा सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.