धुळे येथे मौलाना फजलुर रहमान कासमी यांचे भव्य स्वागत..

आबिद शेख/अमळनेर
धुळे, 21 फेब्रुवारी 2025 (गुरुवार) – उत्तर-पूर्व दिल्ली जमीयत उलेमा उपाध्यक्ष हजरत मौलाना फजलुर रहमान कासमी यांचे धुळे जमीयत उलेमा (अर्शद मदनी) कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले.
या विशेष समारंभात मौलाना शकील अहमद कासमी यांच्या हस्ते मौलाना फजलुर रहमान कासमी यांना सन्मानपूर्वक शाल अर्पण करण्यात आली. जमीयत उलेमा धुळेच्या पदाधिकाऱ्यांनी हा स्वागत समारंभ भव्य आणि उत्साहपूर्ण पद्धतीने आयोजित केला होता.
अल्लाह ताआला मौलाना साहेबांच्या मेहनतींना, प्रयत्नांना आणि जमीयत उलेमाच्या कार्यांना अधिक यशस्वी करो, अशी प्रार्थना करण्यात आली.