वजीर पंच जमातच्या पुढाकाराने जमातखान्याचे काम सुरू – अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली!

आबिद शेख/अमळनेर
वजीर पंच जमातच्या वतीने जमातखान्याच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे. कुदळ मारून या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ करण्यात आला. अनेक वर्षांपासून या कामाची वाट पाहणाऱ्या जमात बांधवांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला आहे.
या वेळी वजीर पंच जमातचे सर्व सदस्य उपस्थित होते. मोठ्या उत्साहात आणि एकजुटीच्या भावनेने हे काम हाती घेण्यात आले आहे. जमातखाना तयार झाल्यास एक मोठी अडचण दूर होणार आहे, त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.