ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद शाळेला टीव्ही, दप्तर व साहित्य वाटप…

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील दोधवद-हिंगोणे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामपंचायत हिंगोणे खु. यांच्या वतीने ४३ इंच टीव्ही, दप्तर व लेखन साहित्य प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम सरपंच श्रीमती ताईसो. राजेश्रीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमास ग्रामपंचायत दोधवदच्या सरपंच सौ. कमलबाई सैंदाणे प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापक श्री. बाळू पाटील सर यांनी सरपंच ताईसो. राजेश्रीताई पाटील यांचा सत्कार केला, तर श्री. रविंद्र चव्हाण सर यांनी स्वागत केले. सरपंच दोधवद सौ. कमलताई सैंदाणे यांचा सत्कार श्री. गुलाब शिरसाठ सर यांनी केला. तसेच आशा वर्कर्स ताईंचा सत्कार श्रीमती जयश्री मॅडम यांनी केला.
ग्रामसेवक श्री. किशोर वाघ, श्री. पाटील दादा हिंगोणे, श्री. नितीन भोई, श्री. राजपूत दादा यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री. बाळू पाटील सर यांनी केले.
प्रास्ताविक श्री. शिरसाठ सर यांनी रे उपयुक्त सूचना दिल्या. आभार प्रदर्शन श्री. नितीन भोई यांनी केले, आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.