धरणगाव येथील हजरत कमाली शा बाबा दर्ग्याच्या प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन…

धरणगाव /प्रतिनिधी. – महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय गणेशजी नाईक यांची भेट घेऊन हजरत कमाली शा बाबा दर्ग्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. या दर्ग्याच्या संदर्भात दबावाखाली दिले गेलेले आदेश आणि जमीन दोस्त करण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री महोदयांनी यासंदर्भातील निवेदन स्वीकारले.
हे निवेदन तोफिक शेख, माजी अल्पसंख्याक मोर्चा जळगाव जिल्हा प्रभारी, ठाणे शहर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा, भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी दर्ग्याच्या पुनर्बांधणी व अन्य महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री गणेश नाईक यांनी या प्रकरणाची योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिले.