महापालिका निवडणुकीवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; प्रभाग रचनेवर होणार युक्तिवाद

24 प्राईम न्यूज 25 Feb 2025
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उत्सुकता वाढली आहे. मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) सुनावणी होणार आहे.
राज्य सरकारच्या वतीने महापालिकांच्या प्रभाग रचनेबाबत युक्तिवाद करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून या निवडणुका रखडल्या असून, सर्वच राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांचे याकडे लक्ष लागले आहे.