‘साई रत्न’ पुरस्काराने चार विद्यार्थ्यांचा सन्मान..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर साई इंग्लिश अकॅडमीतर्फे आयोजित विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रतिष्ठेचा ‘साई रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. इंदिरा भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात यशोदीप पवार, पूनम भारोटे, सनय पाटील आणि सुमित पाटील यांना ‘साई रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश जोशी (अध्यक्ष, म. वा. मंडळ, अमळनेर) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशपाल पवार (वर्ग 1 राजपत्रित अधिकारी, असिस्टंट कमांडंट) यांनी प्रेरणादायी भाषण दिले. प्रमुख अतिथी म्हणून श्यामकांत भदाणे (उपाध्यक्ष, म. वा. मंडळ, अमळनेर), अतुल कोतकर (म्युच्युअल फंड सल्लागार, संगमनेर) आणि सौ. प्रतिभा मगर (सरकारी वकील, पारोळा) यांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. मृणाल पाटील हिने स्वागत गीत सादर केले, तर नेहा पाटील, रिचल पाटील, हिमानी पाटील व कल्याणी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यात 125 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे देऊन गौरवण्यात आले. भैय्यासाहेब मगर (संचालक, साई इंग्लिश अकॅडमी) यांनी प्रास्ताविक केले, तर प्रियंका बारी हिने उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
विद्यार्थ्यांना प्रेरित करणाऱ्या या उपक्रमामुळे नव्या उंचीवर झेप घेण्यासाठी त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल!