टिकट निरीक्षक रुबिना अकीब इनामदार यांचा विक्रमी दिवस!

24 प्राईम न्यूज 26 Feb 2025
मुंबई विभागातील तेजस्विनी 2 बॅचच्या (TTI) ट्रॅव्हलिंग टिकट इन्स्पेक्टर रुबिना अकीब इनामदार यांनी प्रवासी तिकीट तपासणीमध्ये असामान्य कामगिरी करत विक्रमी दिवस नोंदवला आहे.
आजच्या कारवाईत त्यांनी एकूण 150 अनियमित/विनातिकीट प्रवासी आढळून काढले. विशेषतः, पहिल्या वर्गातील 57 विनातिकीट प्रवाशांकडून एकूण ₹16,430/- दंड वसूल करत त्यांनी रेल्वेच्या महसुलात मोठी भर घातली.
रुबिना इनामदार यांची ही कामगिरी प्रवासी नियमांची कठोर अंमलबजावणी आणि रेल्वे प्रशासनाच्या शिस्तप्रियतेचे उदाहरण ठरली आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि रेल्वेच्या तिकीट प्रणालीला सहकार्य करावे, असा संदेश या कामगिरीतून मिळतो.
त्यांच्या या उल्लेखनीय पराक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.