विना परवाना अवैध खेडा खरेदी प्रकरणी व्यापाऱ्यावर कारवाई..

आबिड शेख/अमळनेर
अमळनेर – कृषि उत्पन्न बाजार समिती, अमळनेर यांच्या कार्यक्षेत्रात भरारी पथकाच्या तपासणीत विना परवाना अवैध खेडा खरेदी करताना चोपडा येथील एक व्यापारी आढळून आला.
खेडा खरेदी पातीडा येथे सुरू असलेल्या या अवैध व्यवहाराची माहिती मिळताच भरारी पथकाने तपासणी करून सदर व्यापाऱ्याचा पंचनामा केला. महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 च्या अंतर्गत संबंधित व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून बाजार फीसह दंड वसूल करण्यात आला आहे.
यापुढे कोणत्याही व्यापाऱ्याने परस्पर विना परवाना खेडा खरेदी करताना आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अशोक आधार पाटील, उपसभापती व संचालक मंडळ यांनी स्पष्ट केले आहे.