अमळनेर मध्ये अवैध वाळू उत्खननावर पोलिसांचा छापा, तीन ट्रॅक्टर जप्त..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहर आणि तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. माननीय परीवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री केदार बारबोले यांच्या आदेशानुसार 3 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिसांनी सापळा रचून तीन ट्रॅक्टर जप्त केले.
बोरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बहादरवाडी फाट्याजवळ रात्री 11 वाजता ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
जप्त केलेले ट्रॅक्टर आणि चालक:
- स्वराज 744FE (MH 19 AN 4460) – चालक: रवींद्र बुवाजी दिल (वय 30, राहणार रुपजी नगर, अमळनेर)
- स्वराज 744FE (MH 19 BG 7029) – चालक: अर्जुन शिवा पवार (वय 26, राहणार हिंगोना, तालुका अमळनेर)
- स्वराज 744FE (विना नंबर प्लेट, लाल ट्रॅक्टर, निळ्या ट्रॉलीसह) – चालक: किशोर शांताराम पाटील (वय 26, राहणार हिंगोना, तालुका अमळनेर)
तिन्ही आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 303(2) आणि जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7), 48(8) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करून एक दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत असून, अवैध वाळू तस्करीसह इतर बेकायदेशीर धंद्यांमध्ये गुंतलेल्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री केदार बारबोले यांनी स्पष्ट केले आहे.