विद्यापीठस्तरीय बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात सागर कोळी यांना द्वितीय क्रमांक..

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – कबचौउमवि संचलित प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलन सोमवार, दि. १० मार्च २०२५ रोजी संपन्न झाले. या संमेलनात पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थी सागर सुकदेव कोळी यांनी बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

सागर कोळी यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. समारोप व बक्षीस वितरण समारंभास कबचौउमवि व्यवस्थापन परिषद सदस्य व कार्याध्यक्ष अँड. अमोल पाटील, प्रताप तत्वज्ञान केंद्राचे सल्लागार समिती सदस्य दिनेश नाईक, मानद संचालक प्रा. डॉ. एस. डी. ओस्तवाल, व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सागर कोळी यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे चेअरमन अभिजीत भांडारकर, प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. अस्मिता सरवैया, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. डॉ. डी. आर. ढगे, प्रा. डॉ. अनिता खेडकर, प्रा. डॉ. श्वेता वैद्य, प्रा. डॉ. सागरराज चव्हाण, प्रा. डॉ. भरत खंडागळे यांनी अभिनंदन केले.

या संमेलनाने विद्यार्थ्यांना साहित्य क्षेत्रात आपली कला सादर करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!