वीज मीटर बसवण्यासाठी लाच घेताना अभियंता रंगेहात पकडला

आबिद शेख अमळनेर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (लाचलुचपत विभाग) पथकाने यशस्वी सापळा रचत चोपडा शहरात एक सहायक अभियंता लाच घेताना रंगेहात पकडला. अभियंत्याने एका नागरिकाकडून वीज मीटर बसवून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.
प्रकरणाचा तपशील:
▶️ तक्रारदार: 23 वर्षीय पुरुष
▶️ आरोपी: अमित दिलीप सुलक्षणे (35 वर्षे), सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, चोपडा शहर कक्ष 2
▶️ लाचेची मागणी: 5,500 रुपये (11 मार्च 2025)
▶️ तडजोडीनंतर स्वीकृत रक्कम: 4,500 रुपये (12 मार्च 2025)
घटनाक्रम:
तक्रारदाराने नवीन वीज मीटर बसवून घेण्यासाठी संबंधित अभियंत्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त्यासाठी 5,500 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने हा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव शाखेकडे दि. 11 मार्च रोजी तक्रार दाखल केली. तपास पथकाने प्राथमिक पडताळणी केली असता, अभियंता अमित सुलक्षणे यांनी तडजोडीनंतर 4,500 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
आज, 12 मार्च रोजी, लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचत आरोपीला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्याच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित अधिकारी:
▶️ मार्गदर्शक अधिकारी: श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत विभाग, नाशिक परीक्षेत्र
▶️ पर्यवेक्षण अधिकारी: श्री योगेश ठाकूर, उप-अधीक्षक, जळगाव विभाग
▶️ सापळा व तपास अधिकारी: श्रीमती नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत विभाग, जळगाव
नागरिकांसाठी सूचना:
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्याने कामाच्या मोबदल्यात लाच मागितल्यास, त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावशी संपर्क साधावा.
▶️ टोल फ्री क्रमांक: 1064