पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये होळी व धूलिवंदन उत्साहात साजरे

आबिद शेख/अमळनेर
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे होळी व धूलिवंदन उत्साहात साजरे करण्यात आले. संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत भदाणे यांच्या हस्ते होळीची पूजा करून होळी दहन करण्यात आले.
यावेळी प्रज्ञा पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना होळीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, होळी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, ज्यामध्ये हिरण्यकश्यपूच्या संहाराची कथा सांगितली जाते. तसेच, हा सण रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आनंदाने एकमेकांना रंग लावून धूलिवंदन साजरे केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंजल पाटील मॅडम, मयुरी चौधरी मॅडम, उष्कर्षा लोकंक्षी मॅडम, विजय चौधरी, सखाराम पावरा, उमेश पाटील, राजेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.