गांधीनगर अतिक्रमण प्रकरण: न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश कायम…

आबिद शेख/अमळनेर
गांधीनगर येथील अतिक्रमण संपूर्णपणे हटवण्यात आले असले तरी अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. रहिवाश्यांनी म्हाडामध्ये घरे न देता त्याच ठिकाणी किंवा गावातच पर्यायी घरे मिळावीत, अशी मागणी केली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने १३ तारखेपर्यंत ‘जैसे थे’ आदेश दिला होता. महापालिकेने अतिक्रमण काढून टाकल्याने कायद्याने आता काहीही करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, न्यायालयाने हा विषय वरिष्ठ न्यायालयाच्या मध्यस्थीकडे सोपवला असून, त्या न्यायालयाकडून निर्देश येईपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.