प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन..

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. 22 मार्च 2025 रोजी होणाऱ्या या एकदिवसीय कार्यशाळेअंतर्गत PMUSHA- Soft Component योजनेअंतर्गत Skill Development Programme for Students राबविण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी परस्पर वैयक्तिक कौशल्य, समस्या सोडविण्याचे कौशल्य, नेतृत्व कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, प्रभावी संवाद कौशल्य, विश्लेषणात्मक कौशल्य आणि नितिमत्ता यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेचे उद्घाटन प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे कार्याध्यक्ष प्रा. सुधीर दादा पाटील व मानद संचालक प्रा. एस. डी. ओसवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कार्यशाळेच्या चार सत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान होणार आहे:
🔹 प्रथम सत्र: प्रा. डॉ. भरत खंडागळे – परस्पर वैयक्तिक कौशल्य व समस्या सोडविण्याचे कौशल्य
🔹 द्वितीय सत्र: प्रा. डॉ. निता जाधव – नेतृत्व कौशल्य व वेळेचे व्यवस्थापन
🔹 तृतीय सत्र: प्रा. डॉ. कविता पाटील – प्रभावी संवाद कौशल्य
🔹 चतुर्थ सत्र: प्रा. डॉ. पी. बी. भराटे – विश्लेषणात्मक कौशल्य आणि नितीमत्ता
अमळनेर शहर व परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभागी होऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.