महायुती सरकारमधून नितेश राणे यांना काढा – महाविकास आघाडीची मागणी..

24 प्राईम न्यूज 19 मार्च 2025
मुंबई: महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून त्वरित काढून टाकण्याची मागणी करत मंगळवारी विरोधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.
आघाडीच्या आमदारांनी राणे यांच्या विरोधात घोषणा देत सरकारवर टीका केली. त्यांच्या मंत्रिपदावरून नाराजी व्यक्त करत, त्यांनी जनतेच्या हिताचे काम केले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या निदर्शनांदरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या नेत्यांनी एकजुटीने सरकारवर हल्लाबोल केला.