प्रेम आणि ऐक्याचा सुंदर नमुना: सोंनगिरमध्ये गुज्जर समाजाच्या वतीने रोजेदारांसाठी शरबत वितरण..

24 प्राईम न्यूज 19 मार्च 2025
धुळे शहराजवळील ऐतिहासिक सोंनगिर या गावात रमजान महिन्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा एक सुंदर प्रसंग पाहायला मिळाला. या गावात गुज्जर समाजाचे वर्चस्व आहे, आणि या समाजाच्या तरुणांनी आपली प्राचीन संस्कृती आणि परंपरा जपत रोजेदारांसाठी शरबत वाटपाचा उपक्रम हाती घेतला.
या पुण्याच्या कार्यात कयाम भावु कमर आणि ओनबाश भावु महाजन यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी सोंगिर मस्जिदेचे प्रमुख मौलाना जिया उद्दीन यांना स्वतः शरबत पाजून बंधुत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
आजच्या काळात जातीय सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न सुरू असताना, सोंगिरसारख्या छोट्या गावातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा आदर्श घालून दिला जात आहे.