नंदुरबार बसस्थानकाची दुर्दशा, प्रवाशांना अडचणींचा सामना , अधिकारी झोपलेत का ?

24 प्राईम न्यूज 20 मार्च 2025
नंदुरबार बसस्थानकाची स्थिती पाहून आत्ता सुरू महिन्याच्या तीव्र उन्हाळ्यातच ही अवस्था असेल, तर पुढच्या महिन्यात काय होईल, याची कल्पना येते. नंदुरबार बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी माठ ठेवण्यात आले आहेत, पण त्यात पाणी नाही. महाराष्ट्र सरकारने महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा दिल्या आहेत, पण आजही प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक असूनही नंदुरबार बसस्थानकावर पिण्याचे पाणी, पंखे, वाहनांसाठी पार्किंग यांसारख्या आवश्यक सुविधांचा अभाव आहे. इतक्या उष्णतेतही बसस्थानकावर पंख्यांसाठी पाईप दिसत आहेत, पण पंखे नाहीत. प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत आणि अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही.
दुकानदारांनी प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या रस्त्यांवर चाहचे स्टॉल, रसवंतीचे मशीन व स्टॉल, नासटेचे स्टॉल, बसण्या साठी टेबल खुरच्या, दुकानाचे स्टॉल व फलक असे अतिक्रमण केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे या बस स्टॅन्ड मधला अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ? यावर आगर प्रमुख व इतर अधिकारी गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे . नंदुरबार बसस्थानकावर सर्व व्यवहार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आणि अधिकारी झोपले असल्याचा आरोप प्रवाशांमध्ये आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते आणि काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.