राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना संधी..

24 प्राईम न्यूज 20 मार्च 2025. जळगाव : महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा २० वर्षांखालील ज्युनियर मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन १० एप्रिल २०२५ रोजी लोणावळ्यात करण्यात आले आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा संघ सहभागी होत असून, इच्छुक खेळाडूंनी आवश्यक नोंदणी करून निवड चाचणीसाठी हजर राहावे, असे आवाहन जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना ऑनलाइन पद्धतीने जिल्हा असोसिएशनकडे आपले सीआरएस (CRS) रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. ज्या खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २००६ ते ३१ डिसेंबर २००८ दरम्यान झाला आहे, त्यांनाच निवड चाचणी देण्याची संधी मिळणार आहे.
निवड चाचणी लवकरच जाहीर
जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची निवड चाचणी लवकरच आयोजित केली जाणार असून, त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. निवड चाचणीसाठी खेळाडूंनी पासपोर्ट साईज फोटो, मूळ जन्मदाखला आणि आधार कार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे.
संपर्कासाठी अधिकाऱ्यांची नावे
सहभाग इच्छुक खेळाडूंनी पुढील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा –
- फारूक शेख (सचिव) – 9423185786
- प्रा. डॉ. अनिता कोल्हे – 9850601881
- हिमाली बोरोले – 7385662401
- वसीम शेख – 9765120529
- मोइस चार्लीस – 7385333921
संघटनेने सर्व पात्र खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.