अमळनेर: न्यू प्लॉटमधून ४० हजारांची मोटारसायकल चोरी.

आबिद शेख/अमळनेर
शहरातील न्यू प्लॉट भागातून हिरो होंडा कंपनीची ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीयूष जैन यांनी त्यांची मोटारसायकल २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घरासमोरील अंगणात लावली होती. मात्र, २७ मार्च रोजी सकाळी १० वाजता मोटारसायकल गायब असल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्याने वाहन चोरून नेले असून, याबाबत पोलिसांना कळवण्यात आले.
पुढील तपास पोलीस हवालदार संतोष पवार करत आहेत.