काळ्या फितीसह नमाज अदा करून वक्फ संशोधन विधेयकाचा निषेध..

24 प्राईम न्यूज 30 मार्च 2025

जळगाव : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या सूचनेनुसार, रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी जळगाव शहर व जिल्ह्यातील मशिदींमध्ये काळ्या फिती लावून नमाज अदा करत वक्फ संशोधन विधेयक २०२४ चा निषेध नोंदविण्यात आला. तसेच, हा विधेयक मागे घ्यावा अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले.
१७५ मशिदींमधून ५२ हजार नमाज्यांचा विरोध
जळगाव व परिसरातील १७५ मशिदींमध्ये सुमारे ५२ हजार नमाज्यांनी या विधेयकाविरोधात एकत्र येत निषेध नोंदवला. मशिदींसमोर निदर्शने करून ठरावाचे वाचन करण्यात आले व विधेयकाबाबत जनजागृती करण्यात आली.
प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन सादर
मशिदींच्या प्रतिनिधींनी एकता संघटनेच्या माध्यमातून अप्पर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पाटोळे यांना निवेदन देऊन सरकारला आपला विरोध दर्शविला.
यांची होती उपस्थिती
या आंदोलनात मस्जिद ए अक्साचे फारुक शेख, मदिनाचे अन्वर खान, अबूबकरचे फारुख पटेल, हानफियाचे शाहीर तेली, बिलालचे दानिश पिंजारी, काँग्रेसचे मुक्तदिर देशमुख, अर्कमचे बशीर बुरानी, उमरचे अनिस शहा, अल्वजीरचे अबू शाफे, अलमनांचे जावेद शेख, अलबर्गाचे सईद शेख, बरकतीचे युसूफ खान, नूरानीचे इमरान शेख, अल वजीरचे मुजाहिद अख्तर, अब्दुल सत्तार, अलखिदमतचे युसूफ शाह, तसेच अमळनेर, जळगाव शहर व परिसरातील अनेक मुस्लिम धर्मगुरू व पदाधिकारी उपस्थित होते.