अमळनेर तालुक्यातील धरती माता महिला शेतकरी गटाने पटकावला सत्यमेव जयते फार्मर कपचा प्रथम क्रमांक..

0

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर: पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप २०२४ स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील धरती माता महिला शेतकरी गटाने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली आहे. या गटाला ५०,००० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

याच स्पर्धेत खोकरपाट येथील शंभू महिला शेतकरी गटाने द्वितीय क्रमांक मिळवत २५,००० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह मिळवले, तर पातोंडा येथील गायत्री महिला शेतकरी गटाला तालुकास्तरीय संयुक्त द्वितीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक प्रसिद्ध अभिनेते आमिर खान, किरण राव, फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर तसेच दीपस्तंभ आणि मनोबल फाउंडेशनचे यजुवेंद्र महाजन, डॉ. रवि महाजन, डॉ. रेखा महाजन व इतर मान्यवर उपस्थित होते. यासोबतच महाराष्ट्रभरातील १०,००० पेक्षा अधिक शेतकरी या सोहळ्यास हजर होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४३६० गटांचा समावेश होता. अमळनेर तालुक्यातील ८१ गटांनी या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने डिजिटल शेती शाळेचा लाभ घेतला आणि तंत्रशुद्ध गटशेती केली. शेतकऱ्यांनी नैसर्गिक कीड व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बायोमिक्स व विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर केला. तसेच, गटाने अडजी पडजी (इर्जिक) पद्धतीने परस्परांच्या शेतात काम करून मज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!