महिलाराज! पूज्य सानेगुरुजी नपा. वरिष्ठ कर्मचारी पतपेढीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदावर महिलांची बिनविरोध निवड..

आबिद शेख/अमळनेर
नाशिक, दि. 29 मार्च 2024 – पूज्य सानेगुरुजी नगरपरिषद वरिष्ठ कर्मचारी पतपेढीच्या इतिहासात प्रथमच महिलांना प्राधान्य देत, चेअरमन व व्हाईस चेअरमन पदावर महिलांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सुनील महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत श्रीमती राधा नेतले यांची चेअरमन पदावर तर श्रीमती पूजा उपासणी यांची व्हाईस चेअरमन पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली.

या ऐतिहासिक घडामोडीच्या निमित्ताने संपूर्ण संचालक मंडळाने तसेच उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. बैठकीला संचालक सर्वश्री. शेखर देशमुख, सोमचंद संदानशिव, प्रमोद लटपटे, सलीम खान, गणेश बोरोले, मनोज शर्मा, फिरोज पठाण आणि सचिव प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते.

मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर, उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत सवर्ग अधिकारी व कर्मचारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष सोमचंद संदानशिव, सचिव संतोष बिऱ्हाडे, कोषाध्यक्ष किरण कंडारे यांनीही पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
महिला नेतृत्वाच्या या नव्या पर्वामुळे पतपेढीच्या कारभारात नवी ऊर्जा संचारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.