वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत; भाजपचा व्हिप, उबाठाची भूमिका स्पष्ट नाही…

24 प्राईम न्यूज 2 एप्रिल 2025
लोकसभेत आज (बुधवार) दुपारी १२ वाजता वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले जाणार आहे. केंद्राच्या बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाची चर्चा होणार आहे. भाजपने आपल्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या चर्चेसाठी आठ तास राखीव ठेवले आहेत. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू चर्चेनंतर उत्तर देतील आणि त्यानंतर मतदान होईल.
या विधेयकावरून राजकीय वातावरण तापले असून इंडिया आघाडी कडाडून विरोध करणार असल्याची शक्यता आहे. मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) सेनेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठावर टीका करताना, “उबाठा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवणार?” असा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, उबाठाने खासदारांना व्हिप जारी केला असला तरी त्यांच्या भूमिकेवर अद्याप स्पष्टता नाही. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी, “प्रथम जेडीयू आणि टीडीपीने भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर आम्ही भूमिका घेऊ,” असे स्पष्ट केले.