अमळनेर येथे क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे जैन स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी, जळगाव आणि स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण शिबिर १५ एप्रिल २०२५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, गलवाडे रोड, अमळनेर येथे होणार आहे. १ ते १५ वर्षे वयोगटातील मुले आणि मुली यामध्ये सहभागी होऊ शकतात.
प्रशिक्षण शिबिराचे मार्गदर्शक संजय पवार हे आंतरराष्ट्रीय स्तरावर टांझानिया राष्ट्रीय संघाकडून खेळले असून, त्यांनी इराकमधील नॅशनल छिरेष्ट अकॅडमी अंतर्गत अधिकृत कोचचे प्रशिक्षण घेतले आहे. या शिबिरात खेळाडूंना पॉटिंग टेक्निक, बॅटिंग टेक्निक, बॉलिंग टेक्निक आणि क्रिकेटचे सखोल प्रशिक्षण टर्फ विकेट ग्राउंडवर लिव्हर बॉलच्या साहाय्याने दिले जाणार आहे.
संपर्क: 9850759798