अमळनेर तालुक्यातील सात्री गावात भीषण आग, ५ घरे जळून खाक..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील सात्री गावात भीषण आग लागल्याने ५ घरे पूर्णतः जळून खाक झाली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे आणि मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी तातडीने दोन अग्निशमन बंब पाठवले. तसेच पारोळा, चोपडा आणि धरणगाव येथूनही अतिरिक्त मदत मागवण्यात आली आहे.