उमरा तीर्थयात्रेसाठी हुस्नोदीन खाटीक पत्नीसमवेत रवाना..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर शहरातील इस्लामपुरा येथील रहिवासी हुस्नोदीन शब्बीर खाटीक ऊर्फ अमर दादा हे पत्नी रुकसाना बी यांच्या समवेत पवित्र उमरा तीर्थयात्रेसाठी ३ एप्रिल रोजी रवाना झाले.
हुस्नोदीन खाटीक यांचे आर. के. नगर येथे टायर पंक्चरचे दुकान असून, मेहनत-मजुरी करून त्यांनी सौदी अरेबियातील मक्का-मदिना येथे उमरा तीर्थयात्रेसाठी जाण्याचा निर्णय घेतला. अल बारी टूर्स मार्फत त्यांचा प्रवास मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू झाला असून, ही तीर्थयात्रा एकूण १५ दिवसांची असणार आहे.
उमरा यात्रेसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांचा मित्रपरिवार व सामाजिक बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुशीरोदीन मुल्लाजी, मोना शेख, अमजद अली शाह, मुशर्रत सैय्यद, आरिफ टेलर, अशफाक शेख, अनिस खाटीक, रियाज ठेकेदार, इम्रान कुरेशी आदी उपस्थित होते.