बॉलीवुडचे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन..

24 प्राईम न्यूज 5 April 2025
बॉलीवुडच्या सुवर्णकाळात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे (४ एप्रिल २०२५) निधन झाले. त्यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी झाला होता.
देशभक्तिपर चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांमुळे त्यांना ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘क्रांति’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
मनोज कुमार यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीने एक तेजस्वी तारा गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना.