दिनेश चौधरी यांची यशस्वी घोडदौड: आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सच्या प्रतिष्ठित CEO क्लबसाठी निवड..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील तांबेपुरा येथील दिनेश चौधरी यांनी आपल्या कठोर परिश्रम, समर्पण आणि अपवादात्मक कामगिरीच्या जोरावर आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सच्या CEO क्लबसाठी स्थान मिळवले आहे. त्यांनी YTD GWP 28 लाख रुपये गाठून ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल त्यांना जपानची एक सन्माननीय ट्रिप मिळाली असून, ते जपान, व्हिएतनाम आणि जॉर्जिया या तीन देशांमध्ये सन्मानित झाले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि जिद्दीला आज सगळीकडून दाद दिली जात आहे.
धुळे टीमसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असून, दिनेश चौधरी यांनी संघर्षाला आणि चिकाटीला किंमत असते हे पुन्हा सिद्ध केले आहे. त्यांच्या या प्रवासात शाखा अधिकारी अनिकेत देशमुख (धुळे) आणि युनिट मॅनेजर शोयब शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संपूर्ण टीममध्ये प्रेरणादायी ठरणाऱ्या या यशाबद्दल चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.